कोण ठरवत तुमचं मासिक वेतन ? …संजीव चांदोरकर

    0
    955

    कोण ठरवते तुमच्या शहरातील सार्वजनिक आरोग्य ठेवणाऱ्या कंत्राटावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला मासिक १०,००० रुपये आणि हेज फंड मॅनेजरला महिन्याला १० लाख रुपये उत्पन्न ?

    कोण ठरवते करोना सारख्या जीव जाऊ शकणाऱ्या साथीत देखील कंत्राटावर काम करणाऱ्या नर्सला मासिक २०,००० रुपये आणि एलिट वर्गातील स्त्रियांसाठी बुटीक चालनावणाऱ्याला मासिक ५ लाख रुपये

    कोण ठरवते करोना विषाणूमुळे बळी पडलेल्या तुमच्या जिवलग नातेवाईकाला, ज्याच्या प्रेताजवळ देखील तुम्ही जाऊ शकत नाही, भावनेने शेवटचा नमस्कार करून अंत्यविधी करणाऱ्या स्मशानातील कंत्राटी कामगाराला फक्त मासिक १०,००० रुपये ?

    आणि हि तुलनात्मक यादी किमान १००० प्रोफेशन्स साठी बनवता येईल; जी तुम्ही मनातल्या मनात बनववालच.


    अर्थव्यस्वस्थेत कोणत्या श्रमाला / कौशल्याला / ज्ञानाला नक्की किती मोबदला मिळणार हा १००० टक्के राजकीय अर्थव्यवस्थेचा निर्णय असतो

    कंत्राटावर काम करणारे ते नागरिक प्रौढ आहेत आणि त्यांनी काम करायचे मान्य करताना त्या अटी मान्य केल्या आहेत असे म्हणणे म्हणजे

    बलात्काऱ्याने बलात्कारित स्त्रीचा कन्सेट होता म्हणण्यासारखे आहे


    करोना आपल्या सर्वाना आपल्या राजकीय अर्थव्यस्वस्थेचे अधोविश्व दर्शन करत आहे; जे त्यालाच दिसेल जो स्वतःशी प्रामाणिक असेल

    मला आवाहन करायचे आहे विचारी आणि संवेदनशील मध्यमवर्गीयांना, विशेषतः तरुण वर्गाला.

    आपण गेली चाळीस वर्षे तुमच्या समाजातील कष्टकऱ्यांना साथ देणे सोडून दिल्यामुळे अनेक सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि राजकीय अरिष्ट सदृश प्रश्न तयार झाले आहेत.

    करोना आपल्याला हे शिकवत आहे कि प्रश्न मानवतावादाचा नाहीये; करोना आपल्याला हे सांगत आहे कि “सुरक्षितता मिळाली तर सर्वाना नाहीतर सगळ्यांचा जीव धोक्यात”

    करोना पश्चात येणाऱ्या काळात गेल्या चाळीस वर्षातील सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, राजकीय सर्वच विचार व्यूहांचा पुनर्विचार करू या

    तरच करोना मुळे बळी गेलेल्या आणि जाऊ शकणाऱ्या आपल्या बांधवांचे मृत्यू कारणी लागतील.

    संजीव चांदोरकर (२८ मार्च )

    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here