पश्चिम बंगाल मधून मजुरी करिता परभणी जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या मजुराचा कोरोना काळात २२ मार्च २०२० रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला, त्यानंतर या मजुराच्या पार्थिवाला पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात त्याच्या गावी नेण्याकरिता तब्बल ८४,०००/- रुपये खर्च रुग्ण वाहिकेला द्यावे लागले, अंतिम संस्कारानंतर ही मजुराच्या परिवाराचे फरफट काही थांबली नाही. परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयातून निर्गमित करण्यात आलेल्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत मजुराचे नाव चुकीचे आल्याने २०२० पासून ते २०२२ पर्यंत दोन वर्ष या मजुराच्या कुटुंबियांना वर्धमान जिल्हा पश्चिम बंगाल ते परभणी अशा फेऱ्या माराव्या लागल्या आहेत.
श्रमिक विश्व न्यूज….