समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन

प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसचे पहिले पुस्तक प्रकाशन

0
443
Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ व ‘प्रबुद्ध भारत’ अशी नियतकालिके चालवली. त्यानंतर भैय्यासाहेब आंबेडकरांनी समर्थपणे प्रबुद्ध भारत चालवला, त्यांच्या निधनानंतर हा पत्रकारितेचा वारसा प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकारातून १० मे २०१७ ला पुन्हा एकदा प्रबुद्ध भारताचे पुनर्प्रकाशन झाले.

तेव्हापासून आजपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय घटना – घडामोडींवर संपादक प्रकाश आंबेडकर यांनी मार्मिक भाष्य केले आहे. ते पुस्तक स्वरूपात एकत्रित यावं अशी सर्वांची इच्छा होती, त्या निमित्ताने प्रबुद्ध भारताच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसचे पहिले पुस्तक प्रकाशन होत आहे.प्रकाश आंबेडकर यांच्या फेसबुक अकाऊंट वर या आशयाची पोस्ट प्रकाशित करण्यात आली आहे.

पुस्तकाचे नाव – समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन

लेखक – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

पुस्तक प्रकाशन दि. १० मे २०२२

ठिकाण – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुख्य सभागृह, ज.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई- ४०००२१

कार्यक्रमाची वेळ – दुपारी ०४ वा.

पुस्तकाची किंमत – ३०० रुपये

पुस्तक अ‍ॅडव्हान्स बुकिंग किंमत फक्त – २५० रुपये.

  • टीम प्रबुद्ध भारत

संपर्क –
जितरत्न – ७३८५५५०६३३
वैभव – ८४२१९६९७१७

श्रमिक विश्व न्यूज

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here