संजीव चांदोरकर

भाव का वाढतात तर मागणी-पुरवठ्यात तफावत येते म्हणून या शालेय अभयसक्रमातील विश्लेषणाच्या पलीकडे जाण्याची गरज

भवपातळी आणि मागणी-पुरवठा यातील फरक यांचा जैव संबंध आहेच ; पण गेल्या तीस वर्षात दोन महत्वाच्या घडामोडी खाद्यतेल (व तत्सम कमॉडिटींच्या) भवपातळीवर परिणाम करतात

(अ) जागतिकीकरण आणि (ब) वित्तियकारण


जागतिकीकरणामुळे खनिज तेल , धातू , अन्नधान्य अशा काही कमोडिटीचा एकजिनसी जागतिक बाजार प्रत्यक्षात आला

यात महत्वाचा शब्द आहे “एकजिनसी”; याच एकजिनसीपणामुळे जगाच्या एका भागात एखाद्या कमोडिटीला वाढणारी मागणी आपल्या देशातील भवपातळी प्रभावित करू लागली आहे

खाद्यतेलाच्या बाबतीत आज हे घडत आहे ; कोरोनातुन अमेरिका , युरोप, चीनच्या अर्थव्यवस्था वेगाने बाहेर येत आहेत ; हॉटेल्स , टुरिझम वाढेल आणि या सगळ्यामुळे खाद्यतेलाचा उपभोग वाढत आहे / वाढेल

चीन जागतिक खाद्यतेलांचा जवळपास एक तृतीयांश मागणी नोंदवतो ; तो जागतिक बाजारात उतरत आहे


ज्या कमोडिटीचा जगात व्यापार होतो त्याच कमोडिटीचा कमोडिटी एक्स्चेंज वर फ्युचर / ऑप्शन्स ची खरेदी विक्री होते

कमोडिटी एक्स्चेंजवर वित्तीय संस्था कार्यरत आहेत ; लाखो कोटी डॉलर्सचे व्यवहार होतात ; कोणतीही वस्तुमालाची प्रत्यक्ष खरेदी विक्री होत नसल्यामुळे सट्टेबाजांची जबरदस्त पकड असते

आज भारतासकट अनेक देशातील कमोडिटी एक्स्चेंजवर खाद्यतेलांचे / तेलबियांचे भाव सटोडियांनी आकाशाला भिडवले आहेत

या फ्युचर मार्केटमधील भावांचा निर्णायक परिणाम स्पॉट मार्केट / जेथे प्रत्यक्ष वस्तुमाल खरेदी विक्री होते/ त्यावर पडतो


आता केंद्र सरकारकडे

जागतिक बाजारात होणारे चढउतार आपल्या हातात नाहीत ; पण देशांतर्गत भाव पातळी आवाक्यात ठेवणे केंद्र सरकारच्या हातात आहे ; स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन वा तत्सम संस्था लाखो टन तेलाचे साठे ठेवून वेळ पडेल त्यावेळी हस्तक्षेप करू शकतात (उदा चीन)

आपल्या कमोडिटी एक्स्चेंजवर सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी सेबी बरेच काही करू शकते

अत्यावश्यक वस्तुमाल कायद्यांअंतर्गत कारवाई होऊ शकते

आणि दीर्घकालीन उपाययोजना म्हणून देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवू शकते

मी काही तज्ञ नाही ; या क्षेत्रातले तज्ञ बरेच काही सुचवू शकतील


तुम्ही नेहमी टीका करता ; उपाय सांगत नाहीत असे म्हणणारे लाखो भक्त आहेत

उपाय सांगितले कि त्यांच्यात हिंमत नाही ते त्यांच्या सरकारकडे घेऊन जाण्याची ; लोककल्याण , नफा कमावणे नव्हे हे आणि हेच शासनाचे आद्य कर्तव्य असते हे ठणकावून सांगण्याची ; आणि बिगर आर्थिक धार्मिक , अस्मितेच्या प्रश्नावरून रणकंदन माजवू नका अर्थव्यवस्थेवर लक्ष द्या हे आपल्या नेत्यांना सांगण्याची

संजीव चांदोरकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here