Home श्रमिक विश्व चार कामगार गुदमरले; दोघांचा मृत्यू

चार कामगार गुदमरले; दोघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : गटार स्वच्छ करण्यासाठी खड्ड्यात उतरलेले चार कामगार विषारी वायूमुळे बेशुद्ध पडले.यातील दोघांचा मृत्यू झाला तर एक अत्यवस्थ असून अन्य एकाच्या प्रकृतीवर ही वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.शहरातील सालीम अली सरोवर परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

लोकसत्ता दैनिकात प्रकाशित बातमीनुसार रावसाहेब सदाशिव घोरपडे,अंकुश बाबासाहेब थोरात अशी मृत कामगारांची नावे आहेत तर बाळू खरात,विष्णू उगले यांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली.चारी कामगारांनी पंधरा रुपयात गटार स्वच्छतेचे काम घेतल्याची माहिती नातेवाईकाकडून मिळाली.

श्रमिक विश्व न्युज

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here