परभणी : जिल्ह्यामध्ये चित्रपट रसिकांचा अभिरुची संपन्नतेत भर घालण्याची व दर्जेदार,लघुपट माहितीपट तथा चित्रपटांचा आस्वाद घेत प्रेक्षकांना चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलावंत,दिगदर्शक,तंत्रज्ञ यांचा सह थेट संवाद साधण्याचे व्यसपीठ उपलब्ध करून देत एक प्रकारे चित्रपटांची चळवळ उभी करण्याची संकल्पना परभणी येथील रवी पाठक यांनी चार वर्षांपासून परभणी येथे चालवली आहे.

काय होती मूळ संकल्पना आणि तिला मूर्त स्वरूप देत असतांना कोणत्या अडचणी आल्या या प्रश्नावर रवी पाठक सांगतात,चित्रपट समजावून घेण्याची,तसा दृष्टिकोन असण्याची स्थिती तेवढी आशादायी नसल्याने एक दिगदर्शक म्हणून कामाचा निमित्ताने ज्यांच्याशी भेटी व्ह्याचा,तरुण भेटायचे तेंव्हा एक बाब प्रकाश्याने जाणवायची ती म्हणजे चित्रपटांबद्दल जागृता आवश्यक आहे.

रवी पाठक सांगतात,त्यांनी पुणे येथून परभणी मध्ये परतल्या नंतर मराठी चित्रपट दिगदर्शक उमेश कुलकर्णी यांच्याशी चर्चा करून परभणी फिल्म क्लब हि संकल्पना उदयास आली.
तीन वर्षांचा कालावधीत एकूण 12 सेशन परभणी फिल्म क्लबचा वतीने अत्ता पर्यंत आयोजित करण्यात आली आहेत.सुरुवातीला प्रमुख प्रश्न हा ऑडोटोरियन उपलब्ध करण्याचा पुढे उभा राहिला त्यासाठी परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव सर यांनी संपूर्ण सहकार्य करत प्रमुख अडचण सोडवण्यास मोलाची मदत केल्याचे रवी पाठक सांगतात.

सुरुवातीचे एक वर्षातील परभणीकरांचा कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि पुढे प्रत्येक सेशन साठी प्रायोजक मिळत गेल्याने तथा ऐच्छिक सभासद नोंदणी साठी हि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे परभणी फिल्म क्लब अत्ता चौथ्या वर्षात कार्यरत राहिले आहे.
मागील चार वर्षांपासून आम्ही आपल्या परभणीत एक अभिनव उपक्रम राबवीत आहोत आणि तो म्हणजे
परभणी फिल्म क्लब
चित्रपट साक्षरता वाढावी आणि त्यायोगे परभणीकरांना आशयपूर्ण short films, documentaries आणि feature film पाहता याव्यात तसेच परभणीतील तरुणांना चित्रपट क्षेत्राचे योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने परभणी फिल्म क्लब आम्ही सुरु केला.
कैझन पिक्चर्स परभणी, आरभाट फिल्म क्लब पुणे, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी आणि ज्ञानसाधना प्रतिष्टान परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम परभणीत सुरु आहे.
यात दर महिन्याच्या एका रविवारी आम्ही फिल्म क्लब च्या session चे आयोजन करण्यात येतात ज्या अंतर्गत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लघुपट, माहितीपट आणि चित्रपटाचे screening केले जाते आणि त्यांच्या दिग्दर्शकांना आमंत्रित करून त्यांच्याशी संवाद साधतो.
ऐच्छिक मेंबरशीप (वार्षिक रु 1000) घेवून कोणीही परभणी फिल्म क्लब चे सभासद होऊ शकतात. परभणी फिल्म क्लब चे आज घडीला 210 सभासद आहेत.

संकलन
सचिन देशपांडे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here