संजीव चांदोरकर

जागतिक पर्यावरण दिन : “माणसा”ने अमुक केले, तमुक केले अशा मोघम संज्ञा वापरणे बंद केले पाहिजे.

आतापर्यंत हवामान बदल होत आहे , त्याला कार्बन एमिशन्स जबाबदार आहेत , कार्बन एमिशन्सचा संबंध ऊर्जा वापराशी आहे हे ज्ञान शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहे ; ती चांगली गोष्ट आहे

आणि मग चर्चा डायरेक्ट “चंगळवादा”वर येते ; “माणूस” चंगळवादी , उपभोगवादी झाला आहे , “माणूस” निसर्गावर आक्रमण करू लागला आहे अशी मांडणी होऊ लागते

या चर्चात “माणूस” म्हणजे कोण ? अख्खी “होमो सेपियन्स” जमात ?


पृथीवरील ज्या शेकडो कोटी लोकांना

अजून जगण्यासाठी लागणाऱ्या घरे , पाणी , वीज अशा साध्या भौतिक गोष्टी मिळालेल्या नाहीत ;

त्यांचा चंगळवाद पाच रुपयांचा थंडगार आईस्क्रीमच्या कोनापलीकडे जात नाही

ज्यावेळी जास्तीत जास्त वस्तुमाल बाजारामार्फत उपलब्ध केला जात असताना , तो खरेदी करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती त्यांच्याकडे नाहीये

त्यावेळी चंगळवाद / कार्बन एमिशन्स / ऊर्जेचा वापर आणि अशा तत्सम पापांचे बिल फाडतांना या शेकडो कोटी लोकांची नावे घालायची ?

ज्या आदिवासी समूहांनी हजारो वर्षे जंगलांचा उपभोग आणि पुनर्संवर्धन यांचे मॉडेल सिव्हिलायझेशनला दिले त्यांना जंगले कमी होतात म्हणून दोष द्यायचा

हे आपोआप घडत नाही ; हे नॅरेटिव्ह प्रयत्नपूर्वक सेट केले जाते ; हे शेकडो कोटी लोकांच्या वंचितावस्थेवर मीठ चोळणे आहे


आज मॅथेमॅटिकल मॉडेलिंगने अर्थव्यवस्थेत कोणत्या वस्तुमाल / सेवांचा उपभोग घेतल्यावर किती टन कार्बन एमिशन्स होतात हे शोधणे शक्य आहे

मग काढा समाजातील किती आणि कोणत्या वर्गातील लोक या कार्बन एमिशन्सना जबाबदार आहेत

मग लक्षात येईल कि पृथ्वीवरील फक्त १ टक्का . ५ टक्के , १० टक्के, फारतर २० टक्के लोक एकाच नाही विविध प्रमाणात जबाबदार आहेत

यातील अनेक जण उपभोग देखील घेत नाहीत ; गरजेच्या काहीपट साठवणूक करतात ; ताटात घेऊन न खाता फेकून देतात, अनेक ऍसेट्स गंजत ठेवतात

या १० टक्के वर्गाची सारी मिली भगत आहे ; अलीकडे मध्यप्रदेशातील ग्रीन न्यायालयाने झाड तोडले म्हणून एका आदिवासीला दोन लाख रुपये दंड ठोठावला ;

यांची हिंमत आहे कॉर्पोरेटना प्रत्येक झाडामागे दोन लाख रुपये दंड लावण्याची ? कारण कॉर्पोरेट दाखवतात त्यांचे सगळे कसे कायदेशीर आहे ते !


पृथ्वीवरील ८० टक्के लोकांना ते फक्त होमो सेपियन्स आहेत म्हणून माणूस म्हणून दोषी धरता कामा नये

रोखठोकपणे मूठभर अतिश्रीमंत / श्रीमंत / उच्च मध्यमवर्गीय / मध्यमवर्गीय / निम्न मध्यमवर्गीय / शहरी गरीब / ग्रामीण गरीब अशा वर्गीय संज्ञा वापरल्या पाहिजेत

संजीव चांदोरकर.

श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here