संजीव चांदोरकर

तौक्ते चक्रीवादळ आले , तुमचे खूप नुकसान झाले तर
कोण मदतीला यावे अशी तुमची अपेक्षा असते ? आणि अर्ध्यामुर्ध्या ताकदीनिशी कोण येतात पुढे ? शासन यंत्रणा ! राईट ?

कोरोनाची महासाथ आली , इस्पितळे , लसीकरण या साऱ्या गोष्टींसाठी
कोण मदतीला यावे अशी तुमची अपेक्षा असते ? आणि अर्ध्यामुर्ध्या ताकदीनिशी कोण येतात पुढे ? शासन यंत्रणा ! राईट ?

दुष्काळ , पूर , महासाथ यामुळे शेती / धंदे बसले तर मदत , कर्जमाफी या साऱ्या गोष्टींसाठी
कोण मदतीला यावे अशी तुमची अपेक्षा असते ? आणि अर्ध्यामुर्ध्या ताकदीनिशी कोण येतात पुढे ? शासन यंत्रणा ! राईट ?

आणि हि फक्त अपेक्षा नाही ;

काढा आकडेवारी ; गेल्या १५-१६ महिन्याच्या महाभयंकर कोरोना अरिष्टात कोण तुम्हाला मदत करत आहे

पोलीस , एसटी , सार्वजनिक इस्पितळे आणि अनेक सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या किती शे सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे


लहान मूल काही कमी जास्त झाले तर जसा आईवडिलांकडून अपेक्षा करते

तशी भारतासारख्या गरीब देशातील कोट्यवधी सामान्य जनता संकटात असतांना मायबाप सरकारकडून विविध अपेक्षा करते

आणि यात कमीपणा वाटण्यासारखे काही नाही ; अमेरिका / युरोपात सामान्य नागरिक स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याच्या लायकीचे होईपर्यंत शेकडो वर्षे शासनाने मायबाप सरकरचा रोल केला


पण हि तुमची अपेक्षा पुरी होण्यासाठी शासन यंत्रणा सक्षम हवी , तिच्याकडे भरपूर वित्तीय साधनसामुग्री हवी , त्यासाठी करआकारणी हवी , प्रत्येक क्षेत्रातील प्रोफेशनल्स सार्वजनिक सेवेत यायला हवेत

पण आपल्या देशातील अर्धवट अर्थतज्ञ तीच धोरणे आपल्या देशाला लागू करावीत म्हणून गेली ३० वर्षे ब्रेनवॉश करत आहेत कि

सरकारचा आकार कमी करा , सार्वजनिक उपक्रम बंद करा , अर्थसंकल्पाचा आकार कमी करा

आणि हि धोरणे राबवणाऱ्या राजकीय नेत्यांना आपण निवडून देत आहोत

तुमच्या घरातील, तुमच्या परिवारातील / तुमच्या ओळखीतील कोरोना मुळे मृत्यू पावलेल्या , कोरोना मुळे ससेहोलपट झालेल्याचा चेहरा आठवा , तौक्ते चक्रीवादळ किंवा कोणतेही नैसर्गिक आपत्तीतील दृश्ये आठवा

“मिनिमम गव्हर्नमेंट” ची मागणी करणाऱ्या त्या अर्थतज्ज्ञांना आणि तशी घोषणा करणाऱ्या सर्वोच्च राजकीय नेत्याला जाब विचारा

आणि ठरवा ; तुम्ही निवडलेल्या राजकीय नेत्यांनी तुम्हाला हवी तीच आर्थिक धोरणे राबवली पाहिजेत ना ? नाहीतर लोकशाहीला अर्थ काय ?

संजीव चांदोरकर (१७ में २०२१)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here