श्रमिक विश्व न्यूज रिपोर्ट
परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने केंद्र शासनाचा स्वच्छ भारत अभियानात सद्या सहभाग घेत शहरातील रस्त्यांचा दर्शनी भागात बॅनर लावून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जात आहे.परंतु शहरातील अनेक रस्त्यांना अक्षरशः खड्यांचे स्वरूप आलं असतांना त्यावर काहीही उपाययोजना न राबवता केवळ “स्वच्छ परभणी” अशी प्रसिद्धी केली जाते असल्याचे चित्र आहे.
प्रभाग 16 साखला प्लॉट भागात येणाऱ्या परळी रेल्वे क्रॉसिंग गेट बंद झाल्यावर होणाऱ्या रहदारीचा कोंडीने अक्षरशः नागरिक मेटाकुटीला येत आहेत.भागातील गंभीर आजाराचा नागरिकांना,प्रसूती वेदना होत असतांना ग्रामीण भागातून येणाऱ्या माय-माऊल्यांना अनेक वेळा मोठ्या गैरसोयीचे सामना करावा लागत आहे.वर्षानुवर्षे असुविधांचा सामना करणाऱ्या प्रभागातील नागरिकांना कोणत्याही लोकप्रतिनिधींनी सहाय्य केले नाहीये …शोकांतिका आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने रस्त्यावरील खड्यांबाबत प्रकाशित टोल फ्री क्रमांकावर दाखल तक्रारींवर औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाकडून केवळ टोलवाटोलवी करण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग व कार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्ग विभाग,जालना यांचा कडून प्रभागातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर काही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे सदर शासन विभाग या भागातील रास्ता त्यांचा अख्यारीतीत येत नसल्याचे सांगत असल्याने मग परभणी शहरातील गंगाखेड नाका ते अनुसया टॉकीज हा ४०० मीटरचा रास्ता येतो तरी कोणत्या विभागाचा कार्यक्षेत्रात असा प्रश्न प्रभागातील नागरिकांना पडला आहे.
परभणी शहरातील साखला प्लॉट,लोहगाव रोड वरील वसाहतीतून प्रामुख्याने परभणी शहरात जाणाऱ्या लोहगाव रोड व गंगाखेड नाका या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.पावसाळ्याचा काळात झालेल्या पाऊसामुळे सदर खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचुन त्यातून अनेक दोन चाकी,वाहन चालक व पादचाऱ्यांना अपघाताचा सामना करावा लागत आहे.
बाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या बाबत तक्रार करण्यासाठीच्या टोल फ्री क्रमांकावर मागच्या दोन वर्षी पासून अनेक वेळा तक्रार दाखल करण्यात आलेल्या आहेत.तथा परभणी सार्वजनिक बांधकाम विभाग व कार्यकारी अभियंता,राष्ट्रीय महामार्ग विभाग,जालना यांच्या कडे सुद्धा तक्रार दाखल करून अनेक महिने लोटल्या नंतर हि सदर रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाहीये.
परभणी शहर महानगर पालिकेच्या वतीने गंगाखेड नाका भागात व लोहगाव रोडवर खुल्या प्रमाणात अतिक्रमण करण्याला मुभा देण्यात आली असून,परिणामी रस्ता व त्यावरील खड्डे चुकवत शिल्लक जागाच सामान्य नागरिकांना रहदारी साठी उपलब्ध राहिलेली नाहीये.प्रचंड प्रमाणात अडचणी व परळी रेल्वे गेट लागल्या नंतर निर्माण होणाऱ्या रहदारीच्या कोंडीने दर रोज नागरिक अक्षरशः हवालदिल होऊन जगत आहेत.
परभणी ते लोहगाव मार्ग ठोला रस्त्याच्या निर्माण कामाच्या वेळी अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डे तसेच ठेवण्यात आले असल्याने आणि त्यात अत्ता पाणी साचत असल्याने रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत.बाबत रस्ते निर्माणाच्या तरतुदी नुसार पुढील देखभाल व दुरुस्ती योग्य वेळी करण्यात आली नसल्याने प्रचंड संकटाचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे.
सदर प्रकारे सामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर गांभीर्याने लक्ष देण्याची व रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून रहदारीच्या करिता रस्ता खुला करून देण्याची तसदी कोणतीही शासन यंत्रणा घेण्यास तयार नसल्याचे एकूण चित्र आहे.
श्रमिक विश्व न्यूज,परभणी.
सचिन देशपांडे.