रेमिडेसिवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करा.
ऑल इंडिया युथ फेडरेशन,परभणी.
रेमिडेसिवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या मेडिकल चालकांवर कार्यवाही करावी व मेडिकल व खाजगी हॉस्पिटल फिस संदर्भात विविध उपाययोजना करण्याचा प्रमुख मागणी साठी ऑल इंडिया युथ फेडरेशन,परभणीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.जागतिक महामारी असलेल्या करोना दिवसेंदिवस उग्र रूप धारण केले आहे.दररोज हजारो लोक बाधित व शेकडो मृत्यू होत आहेत.शासनाने अनेक निर्बंध घातले.परंतु करोना प्रार्दुभाव नियंत्रण ठेवता आलेला नाही. करोना मुळे मृत्यू होऊ नये,यासाठी उपयुक्त असलेले रेमिडेसिवर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होताना दिसत आहे असे मुख्यमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रेमिडेसिवर इंजेक्शन चा काळाबाजार करतांना शॉप मध्ये जाणिवपूर्वक फार्मासिस्ट व मालक अनुपस्थित असतात जेणेकरून यांनी केलेल्या कामावर चुकून घडल्याचा आव आणता येतो. परभणी सारख्या मागास व दुुुष्काळी जिल्ह्यामध्ये अन्न औषधी प्रशासन विभागा मधील असलेल्या रिक्त पदाचा पुरेपूर फायदा हे सध्या मेडिकल चालक घेत आहे. लोकांना अडवणूक करून जास्तीचे पैसे घेण्याकडे मेडिकल चालकांचा कल दिसत आहे .कोणत्याही मेडिकल वर रेमिडेसिवर इंजेक्शन साठा उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत कुठलाही ठोस माहिती अन्न औषधी प्रशासन कडे देखील उपलब्ध होत नाही. मर्जीतील किंवा जवळच्या व्यक्तीला किंवा जास्त पैसे देणाऱ्या व्यक्तींनाच इंजेक्शन देण्याकडे कल मेडिकल चालकांचा दिसत आहे. यावर तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने सक्रिय कारवाई करण्याचे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.एकूण सात मागण्या करण्यात आल्या असून त्यात
- रेमिडेसिवर इंजेक्शनची माहिती वेळ ,किंमत , कंपनी,उपलब्धता ठिकाण ऑनलाइन किंवा दर्शनी भागात लावा किंवा प्रसिद्ध करा.
- फार्मासिस्ट नसणाऱ्या मेडिकल वर कारवाई करा.
- रिक्त पदे भरा.
- परभणी सारख्या कायम दुष्काळी भागास हॉस्पिटल दर,डॉक्टर फिस, सिटी स्कॅन,किंवा ईतर तापसणी फिस,नाममात्र करा.
- क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट Act लागू करा.
अचानक तपासणी करून ऍडमिट रुग्णांना खरच ऑक्सिजनची गरज आहे का पहाणी करावी असे निवेदनात स्पष्ट करून मागण्या बाबत योग्य ती कारवाई न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर ऑल इंडिया युथ फेडरेशन, परभणी जिल्हाध्यक्ष संदीप साळुंके यांची स्वाक्षरी आहे.