परभणी जिल्ह्यातील आगामी महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायत निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढणार असुन जिल्हाभरात संघटन मजबुत करण्यावर भर दिला जात असुन स्थानिक प्रश्नांवर काम करुन आगामी निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सुचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या असुन मागील दोन वर्षापासुन जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या, शेतकरी, निराधार व दिव्यांग यांच्या प्रश्नावर आवाज उठवून त्या आग्रहाने सोडविण्याचे काम असो किंवा कोव्हीड महामारीमध्ये सामान्य जनतेच्या मागे खंबीर उभे राहण्याचे काम असो हे काम प्रामाणिकपणे व आक्रमकपणे पक्षाने केले आहे. या कामांमुळे जिल्ह्यातील लोकांची विश्वाहर्ता पक्षाबद्दल वाढली आहे त्याकरीता जिल्हयातील जनता जिल्ह्याच्या विकासासाठी एक आग्रहीपक्ष म्हणून प्रहार जनशक्तीकडे पाहत आहे . अशी माहिती आज प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलींग बोधने यांनी पत्रकार परिषदेत दिली .

जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने

प्रहार जनशक्तीपक्ष हा राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असुन महाराष्ट्र राज्यातील सरकार चांगल्या प्रकारे काम करत असुन जिल्ह्यामधील समस्या व प्रश्न हे स्थानिक पातळीवर वेगळ्या स्वरुपाचे असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिका – यांच्या बैठकीमध्ये आगामी सर्व स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आला . या बाबत पक्ष प्रमुख मा.ना. बच्चुभाऊ कडु यांची पक्षाच्या पदाधिका – यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन स्थानिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी वर्षानुवर्ष रखडलेला जिल्ह्याचा विकास व बकालपणा यावर विकासाचे मॉडेल असलेल्या मा.ना. बच्चुभाऊ कडु यांच्या विचाराने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर लढविण्या बाबत निवेदन देण्यात आले आहे .


परभणी जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासुन ठरावीक पक्ष व ठरावीक नेत्यांचीच सत्ता आहे. सेटलमेंटथे, नात्यागोत्याचे व जातीधर्माचे राजकारण यामुळे परभणी जिल्हाचा विकास होऊ शकला नाही. निवडणुका आल्या की सर्वच नेते एकमेकांच्या पुरक असलेली उमेदवारी देऊन आपल्या मर्जीच्याच उमेदवारांना निवडुण आणण्यासाठी प्राधान्य देतात त्यामुळे जमीनी पातळीवर काम करणा -या अभ्यासू कार्यकत्यांना नेहमी डावलले जाते व परभणी जिल्ह्याच्या माथी जवळचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी म्हणून थोपले जातात त्यामुळेच परभणी जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही . मा.ना. बच्चुभाऊ कडु हे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये विकास पुरुष म्हणून व जाती धर्मा पलीकडचे राजकारण करणारे सामाजीक भान जपणारे राजकिय नेते म्हणून ओळखले जातात, त्यांच्या विचाराने प्रेरीत झालेला कार्यकर्ता हा परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडुन आला तर तो जनतेच्या प्रश्नाला योग्य न्याय देऊ शकेल असा ठाम विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाला आहे . असेही या वेळी पत्रकार परिषदेत श्री.बोधने यांनी सांगीतले.
पत्रकार परिषदेस प्रहार जनशक्तीपक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलींग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, उपजिल्हा प्रमुख भास्कर तारे, परभणी शहर प्रमुख पिटु कदम, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, मानवत तालुका प्रमुख गोविंद मगर, पाथरी तालुका प्रमुख युवराज राठोड, प्रहार ऑटोरिक्षा चालक मालक संघटना शहर प्रमुख बंडु पावडे ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

श्रमिक विश्व न्यूज,

परभणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here