पाच महिन्या पेक्षा अधिकचा कालावधी लोटून ही महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वतीने राबवण्यात येणाऱ्या कुटुंब अर्थ सहाय्य योजनेचा लाभार्थ्यांना परभणी तहसील कार्यालया कडून लाभ मिळू शकलेला नाहीये ….

महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा १२ मार्च २०१३ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेशात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ ( ६० वर्षांपेक्षा कमी ) कर्ता स्त्री / पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबियांना १५ दिवस ते १ महिन्याचा आत एकरकमी ₹ २० हजार इतके अर्थसहाय्य देण्याचा स्पष्ट पणे नमूद केलेले असतांना परभणी तालुका तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागाचा वतीने कायम सदर योजनेचा प्रस्तावधारकांना ताटकळत ठेवण्याचे धोरण राबवले जात असल्याचे दिसून येते.

परभणी शहरातील साखला प्लॉट भागातील ओमप्रकाश व्यंकटराव शेटे नावाचा तरुणाचा करोना आजाराने दि. ०६ ऑक्टोबर २०२० रोजी मृत्यू झाला.तरुण मुलाचा मृत्यू पश्चात त्याचा पत्नीचा वतीने परभणी तालिका तहसील कार्यालयात राष्ट्रय कुटुंब लाभाचा योजने करिता दि.१० नोव्हेंबर २०२० रोजी अर्ज करण्यात आला.पाच महिन्यांचा कालावधी लोटला असतांना मृत्यू पावलेल्या तरुणाचे वयोवृद्ध वडील परभणी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.अनेक प्रकारची कारणे सांगून त्यांना अद्याप लाभ देण्यात आलेला नाहीये.

श्रमिक विश्व रिपोर्ट,परभणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here