भारतीय कम्युनिस्ट पक्ष,जिल्हा परभणी तथा डाव्या आघाडीचा वतीने ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

    0
    463

    परभणी : दि २१ परभणी जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष तथा डाव्या आघाडीचा वतीने ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ बी.रघुनाथ सभागृहात रविवारी दि २१ रोजी संपन्न झाला.

    परभणी जिल्ह्यातील मागचा महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष तथा डाव्या आघाडीचा वतीने निवडणूक लढवणाऱ्या सर्व विजयी सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी कॉ. राजन क्षीरसागर,ऍड माधुरी क्षीरसागर,ऍड लक्ष्मण काळे,कॉ. अब्दुल,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक कदम,संभाजी ब्रिगेडचे शिवाजी कदम,मानव मुक्ती मिशन नितीन सावंत यांच्या सह संपूर्ण परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    श्रमिक विश्व परभणी.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here