रेमडेसीवीर मिळवण्यासाठी धावाधाव करताय? रेमडेसीवीर मिळालं नाही म्हणून वाईट वाटून घेताय ? हा व्हिडिओ बघा… समजून घ्या..
रेमडेसीवीर हे औषध कोविडवर रामबाण औषध नाही. कोविड रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तर आजिबात उपयोगी नाही. ज्या कोविड रुग्णांना ऑक्सिजन लावला आहे, त्यांची काही लक्षणे काही प्रमाणात कमी होण्याइतपतच या औषधाचा उपयोग आहे!
गंभीर कोविड रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तीनच गोष्टी खात्रीलायकरीत्या प्रभावी आहेत.
१) उत्तम आयसीयु केअर
२) ऑक्सिजन
३) dexamethasone इंजेक्शन
व्यर्थ धावाधाव, मानसिक ताण टाळा.
- डॉ अभिजीत मोरे, पुणे