प्रत्येक गरीब व्यक्तीने कष्ट करून श्रीमंत व्हावे असे त्यांचे म्हणणे असते तर त्यांनी समाज-राजकारणात आयुष्य न घालवता अजून गडगंज पैसा मिळवला असता

गरिबांसाठी काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी स्वतःचे देखील कपडे साधे घातले पाहिजेत असे त्यांचे जगण्याचे तत्व असते तर त्यांनी सूट-बूट-हॅट वगैरे सिग्नेचर पेहेराव कधीच केला नसता

आपल्या देशातील जातीव्यवस्था हि फक्त एक आर्थिक व्यवस्था आहे असे त्यांचे म्हणणे असते तर फक्त अर्थव्यवस्था बदलाची मांडणी करून , व्यक्तीच्या आत्मसम्मानाचे महत्व सांगत बसले नसते

प्रत्येकाने स्वतःचेच तत्वज्ञानात्मक उन्नयन करावे असे त्यांचे म्हणणे असते तर लाखो लोकांना सामुदायिकपणे बौद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी एव्हडे कष्ट त्यांनी घेतले नसते


व्यक्तिकेंद्री नव्हे तर सिस्टीमचा विचार करा , स्वाभिमान बाळगा , टेचात राहा , सर्वाना बरोबर घेऊन जगा आणि मोठी स्वप्ने बघा हे शिकवणारे

त्यांचे विचारच नाहीत तर सारे जीवनच जगातील कोणत्याही व्यक्ती , समाज , राष्ट्राला कालातीत संदेश देणारे आहेत

अशा महामानवाला, डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम

संजीव चांदोरकर (१४ एप्रिल २०२१)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here