शहरातील रस्त्यांचा व धुळींचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा..

    प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महानगर पालिका प्रशासन विरोधात शिट्टी बजाओ आंदोलन..

    0
    272
    श्रमिक विश्व फोटो

    परभणी – शहरातील रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असुन शहरातील एकही अंतर्गत रस्ता सुस्थितीत नाही , रस्त्यावर खड्डे आहेत की खडयात रस्ते आहेत असा प्रश्न सामान्य परभणीकर जनतेला पडत आहे परभणी शहारातील रस्त्यावर महागनरपालिका प्रशासनाच्या आफलातुन अंतरराष्ट्रीय कल्पनेतून सिमेंट कॉक्रेट व डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरुंब व मातीचा वापर करण्यात आला त्याचा परिणाम शहरातील रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक नागरीकांना पाटदुखी , मानदुखी धुळीमुळे श्वसनाचे आजार जडले आहेत असे असतानाही परभणी शहर महानगरपालिका प्रशासन नशेत असल्यासारखे वागत असुन शहरातील नागरिक महानगरपालिकेचा भरमसाट मालमत्ता कर भरूनही महानगरपालिका प्रशासन शहरातील जनतेला नागरी सुविधा देण्यानध्य पुर्णपणे अपयशी ठरले आहे या बाबत अनेक वेळा मागणी करूनही परभणी शहर महानगरपालिका प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेतून उठायला तयार नाही. या कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या व गेंड्याची कातडी धारण केलेल्या परभणी शहर महानगरपालिका प्रशासनास जागे करण्यासाठी आज महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या वतीने शिट्टी बजाओ आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्ट मंडळाने परभणी शहर महानगपालिका आयुक्त यांची भेट घेवून त्यांना निवेदन ही सादर केले.


    प्रहार जनशक्ती पक्षाचा वतीने शिट्टी आंदोलनातील शिट्टींचा आवाज ऐकून बहिरे झालेले महानगरपालिका प्रशासन जागे होऊन परभणी शहरातील जनतेला चांगल्या प्रकारचे रस्ते उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा खोटी असेल व नेहमीप्रमाणे पालिका प्रशासन यावर काहीही कार्यवाही करणार नाही याची जाणीव असतानाही सनतशील मार्गाने प्रहार जनशक्ती पक्ष झोपलेल्या महानगरपालिका प्रशासनास जागे करण्याचा एक छोटा प्रयत्न आज केला असून याही उपर जर महानगरपालिका प्रशासन शहरातील जनतेला नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरणार असेल तर परभणी शहर महानगरपालिका प्रशासनाविरोधात याही पेक्षा मोठे जनआंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष, परभणीच्या वतीने उभे केले जाईल व त्यावेळी उद्भवणाच्या कारदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत मा आयुक्त परभणी शहर महानगरपालिका, परभणी हे स्वतः जबाबदार असतील याची कृपया नोंद घ्यावी असे ही या निवेदनात म्हंटले आहे.


    आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, मीडिया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस वैभव संघई, सर्कल प्रमुख श्याम भोंग, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, रामेश्वर जाधव, बाळासाहेब तरवटे मुजीब खान, पांडुरंग शेळके, शेख शफी, शेख बशीर अदी उपस्थित होते.

    श्रमिक विश्व न्यूज

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here