परभणीत अतिक्रमण हटाव मोहीम औतघटकेची करमणूक ठरत आलीय !

पुन्हा अतिक्रमण झाली तर मनपाच्या कोणा अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चित नाहीये !!

श्रमिक विश्व फोटो

परभणी : दि.(३०) दोन वर्षांपासून वाजत असलेले परभणी महानगरपालिकेचे अतिक्रमण हटवायचे ढोल आज प्रत्येक्षात मुख्य बाजारात अवतरले.दरम्यान परभणीकरांना अशी काही कारवाई यंत्रणा राबवू शकतात याचा विसर पडला होता,इतकी शहराची भीषण अवकळा झालेली पाहायला मिळते.परभणी शहर महानगरपालिकाचा पंचवार्षिक कार्यकाळ आत्ता काल परवा संपला आणि प्रशासक नेमल्या नंतरची अशी धडक कारवाई करण्यात येईल याची शहर भर घोषणा करण्यात आली.म्हणजे आधी काही राजकीय दबाव होता का ? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अतिक्रमणाचे अति कारणे …

परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मिळून शाश्वत रोजगाराची नित्य वणवा, उदरनिर्वाहाचा अपरिहार्य कारणाने मग रोजंदारी साठी कुठे कुठे लग्गे लावून चहा-पाणी,पान टपरी,वडापाव,भेळपुरी अश्या उद्योगांची चौका चौकात रस्त्यांच्या कडेला दुकाने थाटली जातात.त्यांचे रस्त्यावर येणे जणू विधिलिखित ठरलेले.परभणी मनपा प्रशासन देखील हे पुरते जाणून असल्याने चार-दोन वर्षात एखादी करमणूक कारवाई करण्याची कला त्यांना एव्हाना ज्ञात झालेली.त्यात रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात जिल्हा प्रशासनाने कधी सूचना केली की वाहतूक पोलीस प्रशासनाने,शहर भर मध्ये निमुळत्या रस्त्यांवर अवजड वाहनांचा मुक्त संचार कधी परिवहन विभागाला दिसला नाही. परिणामी वाहतूक कोंडी नित्याची बाब,रोज वर्तमानपत्रात कोंडीचे फोटो आणि शामुर्गाचे डोके जमिनीत खोसलेले.

मोठा गाजावाजा करून सुरू झालेली ही अतिक्रमण हटाव मोहीम परभणीकरांना औतघटकेची करमणूक आहे,ते यासाठी की पुन्हा जैसे थे परिस्थिती व्हायला उना पुरा महिनाही लागणार नाही;कारण पुनश्च रस्त्यांवरील अतिक्रमण स्थायी झाली तरी मनपाच्या कोणा अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चित नाहीये.कायदे कानून केवळ कागदावर आहेत त्यावर काही मनोरंजक उपाय शोधले गेले आहेत.ज्यातून आजार बरा होण्याची शक्यता सुतराम नाहीये,पण खूप काही करण्यात येत असल्याचा आव मात्र आहे.

श्रमिक विश्व न्यूज

परभणी शहरातील रस्त्यांवर अस्तव्यस्त उभी करण्यात येणारी वाहने,फेरीवाले,सर्रास वाहतूक नियमांची पायमल्ली करणारे महाभाग यांची काही कमी नाहीये.त्यात परभणी मनपा अस्तित्वात येऊन दहा-बारा वर्षांचा कालावधी लोटला पण किमान रहदारीचा प्रश्न अद्याप सोडवण्यात आलेला नाहीये.वर्षानुवर्षे बंद अवस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा जाग्यावर दम तोडून खंगली आहे.अनेक वेळा न्यायालयाच्या आलेल्या निर्णयानुसार अतिक्रमणाच्या बाबत जबाबदार अधिकाऱ्यांना कारवाईची सूचना असतांना त्याची अंमलबजावणी मात्र क्वचित प्रसंगी ही होतांना दिसत नाही,परिणामी अश्या कारवाया औटघटकेची करमणूकच सिद्ध होत आल्या आहे.

@श्रमिक विश्व न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here