
परभणी : (दि.२०) महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने आरंभ करण्यात आलेल्या महिला सशक्तीकरण अभियानाला परभणी जिल्ह्यात नमनालाच प्रशासकीय लालफितीचा कारभार आढवा आला आहे.महाराष्ट्र राज्याच्या महीला व बाल विकास विभागाकडून ०६ ऑक्टोबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेशाला आचारसंहिता लागली पण जिल्ह्यात पाच महिन्यात आकार येऊ शकला नसल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेल्या ११ कलमी कार्यक्रमाची व राज्यात ७३ लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा आदेश ही परभणी जिल्ह्यात प्रत्येक्षात मूर्त स्वरूपात येऊ शकलेला नाहीये.





























