नोकर भर्तीच्या मागणीसाठी महाराष्ट्र बँक कर्मचारी संपावर !

०९ व १० फेब्रुवारी रोजी संपाचा इशारा

0
224
श्रमिक विश्व न्युज
श्रमिक विश्व न्युज
०९ व १० फेब्रुवारी रोजी संपाचा इशारा

पुणे :बँक ऑफ महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनांचे सर्व सभासद प्रामुख्याने नोकर भरतीच्या प्रश्नावर एक दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत.संपात सर्व संघटना सहभागी असल्यामुळे शाखांचे दरवाजे देखील उघडले गेले नाहीत संपामुळे जवळ जवळ दोन हजार पेक्षा जास्त शाखातून रोखीने अथवा चेक वटनावळीचे कुठलेच व्यवहार होऊ शकले नाहीत.

बँकेत पुरेशी नोकर भरती न केल्यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावे लागत आहे तर दुसरीकडे ग्राहकांना देखील अनेक असुविधांना तोंड द्यावे लागत आहे याचा बँक कामकाजावर देखील विपरीत परिणाम होत आहे पण हस्तिदंती मनोऱ्यावर बसून काम करणाऱ्या व्यवस्थापनाला याची जाणीव नाही आणि झाली तरी ते जानतेपणी ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वत्रपरी प्रयत्न केले पण असंवेदनशील व्यवस्थापनानी आपले आडमोठेपणाचे धोरण तसेच कायम ठेवले म्हणून अखेर हा संप अटळ बनला असे बँक संघटनांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

यानंतर संघटनांनी ०९ आणि १० फेब्रुवारी रोजी दोन दिवसाची संपाची हाक दिली आहे मधल्या काळात संघटनांचे प्रतिनिधी या बँकेचा मालक असलेल्या भारत सरकारने यात हस्तक्षेप करावा आणि पुरेशी नोकर भरती करावी यासाठी बँकेला निर्देश द्यावे अशी मागणी करण्यात करण्यात आली आहे.

श्रमिक विश्व न्युज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here