परभणी -(दि :२९ ) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी तालुक्यातील पाथरा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न झाले.
या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी सह नागरिकांच्या रक्त व थुंकी चे नमुने घेण्यात आले तसेच उच्च रक्तदाब मधुमेहाची ही तपासणी करण्यात आली तसेच तपासणी झालेल्या नागरिकांना मोफत औषधोपचार ही करण्यात आले.
मागील काही वर्षापासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर व इतर सामाजिक उपक्रम नेहमी राबविल्या जातात.
पाथरा येथील भीम नगर येथे घेण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी शिबिरास उद्घाटक म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक बांधिलकी असलेले शिक्षक हनुमंत आंबिरे व पाथरा गावचे सरपंच मधुकर काकडे उपस्थित होते. शिबिरात ३१४ नागरिकांनी आरोग्य तपासणी व औषधोपचार घेतले. या आरोग्य शिबिरास प्राथमिक आरोग्य केंद्र पिंगळी येथील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह पाथरा येथील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी ताई यांनी वैद्यकीय सेवा पुरवली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव, पाथरा येथील प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक, तालुकाप्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, सय्यद मुस्तफा, कुंडलीक गरुड, सुधीर देशमुख, युवराज देशमुख, सुरेश काकडे, तानाजी कांबळे, गणेश कांबळे, ज्ञानोबा कांबळे यांनी प्रयत्न केले.